कुंभारखेडा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

0
1

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राम कृष्ण हरी भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने कुंभारखेडा, ता. रावेर येथील रामनगर येथे 6 ते 13 एप्रिल दरम्यान संगीतमय श्रीमद दशावतार कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ६ एप्रिल २०२२ ते दि. १३ एप्रिल २०२२ दरम्यान  सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अमृत वाणीतुन या कथेचे निरूपण करण्यात येणार आहे. कथे दरम्यान श्री मत्स्य अवतार, वराह अवतार, वामन अवतार, सीता स्वयंवर रामायण, श्री कृष्ण लीला चरित्र, बुद्ध अवतार, सुदामा चरित्र, श्री निष्कलंकी अवतार चरित्र आदी सह संगीतमय सजीव देखावा प्रसंग भाविक भक्तांना बघायला मिळणार आहे. तसेच या कथे दरम्यान रात्री ८-०० ते १०-०० असा हरी संकिर्तन कार्यक्रम होणार आहे. दररोज सकाळी ५-०० ते ६-०० काकडा आरती, ६-०० ते ७-०० विष्णुसहस्रनाम, दुपारी १२-०० ते ५-०० श्रीमद दशावतार कथा, संध्याकाळी ६-०० ते ७-००  हरिपाठ व रात्री ८-०० ते १० हरी संकिर्तन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सांगता दि.१३ एप्रिल रोजी होणार असून दुपारी १२-०० ते ५-०० पर्यंत महाप्रसाद व संध्याकाळी ६-०० ते ९-००  दिंडी सोहळा होणार आहे.

दि. ६ पासून अनुक्रमे हभप ज्ञानेश्वर महाराज मेहूण, हभप प्रल्हाद शास्त्री महाराज सिन्नर (नाशिक), हभप ब्र. हरिदास महाराज पळसखेड (बुलढाणा) हभप दीपक महाराज रेलकर धरणगाव, हभप नागेश्वरी महाराज झाडे आळंदी, हभप डॉक्टर जलाल महाराज सैय्यद करंजीकर, हभप विजय महाराज मुक्ताईनगर व शेवटच्या दिवशी हभप तुकाराम महाराज चिंचोली यांचे सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन असा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी भाविक भक्तांनी या कथा, हरी संकीर्तन सप्ताहाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन कुंभारखेडा येथील रामकृष्ण हरी भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळ यांनी आवाहन केले आहे.