बॅंड पथकास परवानगी मिळण्याबाबत खासदारांना निवेदन

चाळीसगाव प्रतिनिधी । सध्या देशात कोरोनाचा सावट असल्याने अनेक व्यावसायिकांना याची झळ सोसावी लागत आहेत. त्यात वाजंत्री बँड पथके हे हातावरच पोटाची खळगी भरत असल्याने किमान आठ-दहा लोकांच्या उपस्थितीत वाजंत्री वाजवण्याची परवानगी द्यावी या आशयाचे निवेदन खासदार उन्मेष पाटील यांना आज देण्यात आले आहे.

चाळीसगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ही दिवसागणिक गडद होत आहे. याची झळ अनेक व्यावसायिकांना बसत आहे. वाजंत्री बँड पथक, चालक, मालक व कलावंतांचे कोरोनाच्या काळात उत्पन्नाचे स्रोत ठप्प झाल्याने किमान आठ-दहा लोकांच्या उपस्थितीत वाजंत्री वाजवण्याची परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संस्थेच्या वतीने आज खासदार उन्मेष पाटील यांना निवेदन देण्यात आले. सध्या कोरोनामुळे तालुक्यातील प्रत्येक वाजंत्रीवर उपासमारीची वेळ आली आहेत. तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या लग्नसराईचे अतिरिक्त रक्कम घेतले असल्याने वाजंत्रीवर परत देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून आठ-दहा लोकांच्या उपस्थितीत वाजंत्री वाजवण्याची परवानगी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. 

यावेळी महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संस्था यांच्या वतीने अनिल साळुंके, विनायक महाजन, रवींद्र खैरनार, प्रकाश राठोड यांच्यासह काही बँड वडाळा येथील जय शंकर बँड, करगाव येथील आनंद बँड , महारुद्र बँड शेवरी, साई श्रद्धा बँड (शिंदी), गजानन बँड (खेडगाव), माऊली बँड (वाघळी), साई झंकार बँड (घोडेगाव), शंभूराजे बँड (बोरखेडा), माहेश्वरी बँड (चाळीसगाव), गणेश बँड (वडाळा), साई मल्हार बँड (लोंढे), द्वारकामाई बँड पथक (हिंगोणे), साई दर्शन बँड (हिंगोणे), दिनेश बँड बँड पथक (बोरखेडा), विनय बँड पथक (दहीवद), दिपाली बँड (पातोंडा), शिव पूजा बँड पथक (सेवानगर), जयश्री बँड पथक सेवानगर अशा विविध बँड पथकातील चालक-मालक, गायक कलावंत  उपस्थित होते. याप्रसंगी खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडताना अनेक बँड चालक, मालक, गायक, कलावंत यांना अश्रू अनावर झाले होते. खा.उन्मेश पाटील यांनी धीर देत काळजी करू नका प्रशासनाच्या अटी-शर्तीस अधीन राहून तुमच्या व्यवसायासंदर्भात मार्ग काढू असा विश्वास व्यक्त केला.

Protected Content