नागरिकांना काळजी घेण्याचे आमदार चौधरी यांचे आवाहन

 

 

रावेर, प्रतिनिधी  । तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच चलला असून शिंगाडी चिनावल तर हॉटस्पॉट ठरले आहेत.  जनतेला माझी हात जोडून विनंती आता तरी काळजी घ्या अन्यथा परीस्थिती हाता बाहेर जाईल असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले.  दरम्यान,  ऑक्सिजन सेंटर कोरोना बाधीतांना बघुन आमदार चौधरी भावनिक झाले होते. 

रावेर कोरोना सेंटर व ऑक्सिजन सेंटरच्या सोई-सुविधांच्या पाहणीसाठी आमदार शिरीष चौधरी रावेर आले होते. यावेळी ते पुढे बोलतांना म्हणाले की, ऑक्सिजनची बंद पाईप लाईन दुरुस्तीसाठी पुण्यावरुन लवकरच मॅकेनिकल येऊन दुरुस्त केले जाणार आहे. तालुक्यात मृत्युचे वाढले प्रमाण गंभीर आहे. यासाठी रेमडीसीविर संदर्भात सिव्हिल सर्जन यांच्याशी बोलणे करून ५० इंजेक्शन रावेर ग्रामीण उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आमदार यांनी सांगितले.  यावेळी त्यांनी रावेर फैजपुर न्हावी यावल येथील कोविड सेंटरची देखिल पाहणी केली.

यांची होती उपस्थिती

दरम्यान, आमदार शिरीष चौधरी यांच्या सोबत तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एन .डी .महाजन, मुख्यधिकारी रविंद्र लांडे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राजू सर्वेणे, संतोष पाटील, महेश लोखंडे, धुमा तायडे, डॉ. सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

अधिका-यांच्या पाठिवर कौतुकाची थाप

कोरोना सारख्या महामारीत तालुक्यातील अधिकारी जिकरीने काम करत आहे. त्यांचे खरच कौतुक केले गेले पाहिजे प्रत्येक जण स्वता:चा जीव वाचवण्यासाठी धडपड करत असतांना तालुक्यातील अधिकारी जनतेचा आरोग्यासाठी लढा देत असल्याचे म्हणत त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे  कौतुक केले.  कोरोनाच्या काळात वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी .महाजन, डॉ. शिवराय पाटील, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल, मुख्यधिकारी रविंद्र लांडे सारखे अधिकारी कोरोना विरुध्दात जनतेसाठी लढा देत आहे.

 

तालुक्यात तीन हजार एक्टिव तर ११० मृत्यु

रावेर तालुक्यात सद्या झपाट्याने पेशंट वाढण्यामध्ये शिंगाडी (१७),  चिनावल(२०) व तांदलवाडी(२२)असल्याचे डॉ. शिवराय पाटील सांगताय त्यामुळे हा भाग हॉटस्पॉट आहे.तर तालुक्यात तीन हजार एक्टिव तर ११० मृत्यु  झाले असून तिघाही गावांमध्ये उद्यापासुन कोरोना टेस्ट कॅम्प लावले जाणार व प्रत्येक घरातील नागरीकांची तपासणी केली जाणार असल्याचे गट विकास अधिकारी दिपाली कोतवालां लाईव्ह’शी बोलतांना सांगितले.

Protected Content