Home Cities जळगाव कोल्हे हिल्स परिसरातील विवाहितेचा छळ

कोल्हे हिल्स परिसरातील विवाहितेचा छळ

0
49
mahila


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कोल्हे हिल्स परिसरात असलेल्या साईनगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या तीन जणांविरूद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, दीपाली कापडणे यांचा धुळे येथील  प्रदीप भानुदास कापडणे यांच्याशी विवाह झाला आहे. प्रदीप  कापडणे यांना दारूचे व्यसन असल्याने त्यातून ते पत्नी दिपाली कापडणे हिस वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ करतात . तसेच शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक छळही करतात. याच प्रकारे सासू सासऱ्यांनीही दिपाली छळ केला. अशा दिपाली कापडणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती प्रदीप कापडणे सासरे भानुदास कापडणे व मनीषा भानुदास कापडणे  तिघे रा. आनंद हौसिंग सोसायटी राममंदिर धुळे या तीन जणांविरूद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक नरेंद्र पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound