साकळी विकासोच्या निवडणूकीत शेतकरी पॅनलचे वर्चस्व

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलला ९ जागा आल्याने आपले बहुमत सिध्द केले आहे. तर प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीत काही जागांवर अतिशय धक्कादायक निकाल लागलेले असून परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांमुळे विजयी शेतकरी पॅनलच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक झालेली दिसून आली. तर काही लढती या अतिशय अटितटीच्या सुद्धा झाल्या. तर माघारी दरम्यान शेतकरी विकास पॅनल एक जागा अगोदरच बिनविरोध निवडून आलेली आहे. या निवडणुकीमुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे

शारदा विद्या मंदिर शाळेत झालेल्या मतदानात दरम्यान एकूण ४६३ मतदारांपैकी तब्बल ४२२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला आणि त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करण्यात आली.या निवडणूकीत परिवर्तन पॅनल व शेतकरी विकास या दोघं पॅनलच्या उमेदवारांमध्ये लढत काट्याची होती.

निवडणुकीत विजयी झालेले शेतकरी विकास पॅनलचे कर्जदार खातेदार प्रतिनिधी (जनरल) मतदारसंघात  मोहन काशिनाथ बडगुजर(२१०), आत्माराम चुडामण तेली(२०४), अरुण रामचंद्र खेवलकर (२००) ,सुनिल बाबुलाल नेवेवाणी( १९६),निंबा पंडित पाटील (१९३),महिला राखीव मतदारसंघात आशा रविंद्र बडगुजर(२०५), लिलाबाई भगवान मराठे (२१२), अनुसूचित जाती- जमाती राखीव मतदारसंघात  मराबाई सर्फराज तडवी(२०९) तर  परिवर्तन पॅनल कडून विजयी झालेले कर्जदार खातेदार प्रतिनिधी (जनरल) मतदारसंघात सुभाष भास्कर महाजन(१९९), रामा दगडू निळे(१९२), राजेंद्र पंडित बडगुजर(१९१), तर इमाव (ओबीसी) राखीव मतदार संघात शाम वसंतराव महाजन(२१५) यानुसार दोघ पॅनलचे विजयी उमेदार आहे. तसेच विजा/भज व विमाप्र राखीव एका जागेवर शेतकरी विकास पॅनलचे ईश्वर धोंडू कोळी हे अगोदर बिनविरोध निवडून आलेली आहे.त्यामुळे शेतकरी विकास पॅनल एकूण ९ जागा मिळालेल्या आहे.

जि.प. शिक्षण व आरोग्य विभागचे माजी सभापती रविंद्र पाटील व प्रगतिशील शेतकरी मोहसिन खान यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी तर माजी जि.प.सदस्य वसंत महाजन  यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी निवडणूक लढली.

या निवडणुकीत इतर सर्व लढतील सोबत इमाव (ओबीसी) राखीव मतदार संघात शेतकरी विकास पॅनलचे विलास चंद्रभान पाटील यांच्या विरोधात परिवर्तन पॅनलचे श्याम वसंतराव महाजन या दोघांची अतिशय काट्याची लढत होती. दोघंही उमेदवार अतिशय मातब्बर व राजकीय दृष्ट्या वलयकिंत असल्याने ही लढत प्रतिष्ठेची बनली होती. तथापि या लढतीत परिवर्तन पॅनलचे श्याम वसंतराव महाजन यांचा २८ मतांनी विजय झाला तर विलास पाटील यांना पराभवास सामोरे जावे लागले. श्याम महाजन यांना( २१५ ) तर विलास पाटील यांना ( १८७) मते मिळाली. विजयी झालेले श्याम महाजन हे माजी जि.प.सदस्य वसंतराव महाजन यांचे चिरंजिव असून प्रगतीशिल शेतकरी आहे तर विलास पाटील हे यावल कृऊबाचे माजी संचालक तथा सरपंचपती आहे.त्याचप्रमाणे गावातील विविध पदे भूषविलेले तसेच विद्यमान ज्येष्ठ संचालक मुसेखाँ इसेखाँ पठाण हे सुद्धा शेतकरी विकास पॅनल कडून निवडणूक रिंगणात होते मात्र यांना सुद्धा अगदी थोड्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले. या दोघं पराभूत उमेदवारांचा पराभव शेतकरी पॅनलसाठी फार मोठा धक्का मानला जात आहे.   दोघ पॅनलमधील काही मातब्बर उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागल्यामुळे दोघं पॅनलमध्ये ‘कही खुशी-कही गम ‘असे चित्र दिसून आले. त्यामुळे विजयाचा जल्लोष झाला नाही.

Protected Content