राष्ट्रपतींच्या हस्ते विजेते पद्म पुरस्कारानं सन्मानित

दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्रातील हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे आणि ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेता निरज चोप्रसह अनेकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी ‘२०२२’चा पद्म पुरस्कार प्रदान करत सन्मानित केलं.

गायिका प्रभा अत्रे आणि कल्याण सिंह यांना पद्मविभूषण, भारत बायोटेकचे कृष्णा एला आणि सुचित्रा एला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. निरज चोप्राला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

यासह टोकिओ पॅरालम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि भालाफेकपटू सुमित अंतिलला पद्मश्री, गायिका सुलोचना चवन यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

आयरलँडचे प्राध्यापक रुट्गर कोर्टेनहोर्स्ट यांना आयरिश शाळांमध्ये संस्कृत भाषेच्या प्रसाराच्या प्रयत्नांसाठी पद्मश्री देण्यात आला. प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगमला देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content