‘चक्की पिसींग अँड पिसींग २.०’ : नाथाभाऊ इन अ‍ॅक्शन

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आज करण्यात आलेल्या अटकेनंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आधीच केलेल्या ‘चक्की पिसींग अँड पिसींग’ या उक्तीची आठवण झाली आहे. राजकीय दुश्मनीतील हिशोब चुकता करण्याचा हा दुसरा अंक जिल्ह्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणारा ठरला आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बीएचआर घोटाळ्याबाबत आधी फार काही वक्तव्ये केली नव्हती. मात्र यात बडे मासे अडकणार असून चक्की पिसींग अँड पिसींग होणार असल्याचे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखविले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज पहाटे पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या सात जणांना अटक या बाबी महत्वपूर्ण मानल्या जात आहेत.

एकनाथराव खडसे यांनी आधी जळगावचे अनभिषीक्त सम्राट सुरेशदादा जैन यांना कायद्याच्या माध्यमातून तुरूंगवारी घडविली होती. याप्रसंगी त्यांची ‘चक्की पिसींग अँड पिसींग’ ही उक्ती चर्चेचा विषय बनली होती. आता सात जणांच्या अटकेनंतर त्यांची ही उक्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आज झालेल्या कारवाईत एकाच दगडात अनेक पक्षी मारले गेले आहेत. याबाबतच अचूक विश्‍लेषण लाईव्ह ट्रेंडस न्यूज लवकरच आपल्याला सादर करत आहे.

Protected Content