Home क्राईम तलवार घेवून दहशत निर्माण करणाऱ्या तरूणास अटक

तलवार घेवून दहशत निर्माण करणाऱ्या तरूणास अटक


ramanand aropi

जळगाव प्रतिनिधी । समता नगरात हातात तलवार घेवून नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 24 वर्षीय तरूणाला शहरातील समता नगरातून रामानंद नगर पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामानंद नगर पोलीस स्थानकातील डिबी पथकाचे पो.ना. प्रदीप चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून 1 मे रोजी सायंकाळच्या सुमारास महाबळ गाडगे चौकात मनोज केशव पवार (वय-24) रा. हमाल गल्ली समता नगर हा हातात तलवार घेवून फिरत असल्याचे समजले. रामानंद नगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. गोपाल चौधरी, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ. ज्ञानेश्वर कोळी, पो.कॉ. रूपेश ठाकरे यांनी सापळा रचून मनोज पवार याला तलवार घेवून फिरत असतांना रंगेहात पकडले. पो.कॉ. रूपेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात संशयित आरोपी मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ. गोपाल चौधरी करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound