बुलढाणा, अमोल सराफ | कोरोना काळानंतर शहरी भागापासून ते गाव खेड्यापर्यंत विविध ठिकाणी होलिका दहन कार्यक्रम सर्वत्र संपन्न होत आहे.
मागील दोन वर्षापासून सामुहिकरित्या अनुभवू न शकलेला क्षण आता ‘याची देही याची डोळा’ विविध ठिकाणी नागरिकांना अनुभवला. दिवसभर बच्चे कंपनी यांनी तयार केलेल्या चाकोल्या, गौऱ्या याचं होळीत दहन करत अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक होलिकोत्सव साजरा करण्यात आला. वृक्षतोड न करता टाकाऊ वस्तू या होळीमध्ये दहन करून आपला होलिकाउत्सव साजरा करतानाचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून आले.