Home Cities अमळनेर अमळनेरात ८४ हजारांचा एैवज लंपास

अमळनेरात ८४ हजारांचा एैवज लंपास

0
319

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील गायत्री नगरात घरफोडी करून सोन्या चांदीचे देवांच्या मुर्त्या, मणी मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघड झाली झाहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जय योगेश्वर हायस्कूल जवळील गायत्री नगरातील रहिवाशी सुचेता अरुणराव साळुंखे यांच्या घरात बुधवार दि. ९ दुपारी ते गुरुवार दि. १० च्या सकाळी ११ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी ८४ हजार ७०० रुपये किमतींचे सोन्या चांदीचे देवांच्या मुर्त्या तसेच मंगळसूत्र चोरून नेले. यासंदर्भात अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरीफ पठाण करीत आहेत.


Protected Content

Play sound