पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज नंदू शेलकर | ५ राज्यात झालेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुरसह गोवा राज्यात भाजपाने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात तसेच एकमेकांना पेढे भरवुन ५ राज्यातील भाजपचा विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.यावेळी पिंपळगाव – शिंदाड गटाचे जि. प. सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, शहर अध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई पाटील, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, उपाध्यक्ष रमेश शामदानी, तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, शहर सरचिटणीस दिपक माने, प्रज्ञावंत आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनिल पाटील, युवा मोर्चा शहर चिटणीस भावेश पटेल, प्रदिप पाटील, ज्येष्ठ नेते किशोर संचेती, बाळकृष्ण धुमाळ, राहुल पाटील, भैय्या ठाकुर, मुकेश पाटील, विनोद पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.