Home धर्म-समाज जागतिक महिला दिनानिमित्त श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या वतीने कर्तृत्ववान महीलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या वतीने कर्तृत्ववान महीलांचा सत्कार

0
70

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेत जागतिक महिला दिनानिमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.

 

समाजकार्य करणाऱ्या संस्थेच्या जेष्ठ संस्थापक संचालिका तसेच पत्रकार दै. लोकशाही या वृत्तपत्राच्या संपादिका शांता कमलाकर वाणी , बॅंकेच्या संचालिका सुनिता विलास गडे तसेच बॅकेच्या कर्मचारी (रोखपाल ), संगीता सतिष श्रावगी यांचा बॅकेच्या संचालक मंडळातर्फे तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री व्यास धनवर्षा बॅकेचे अध्यक्ष शरद यावलकर, उपाध्यक्ष महेश वाणी, संचालक डॉ. सतिष यावलकर, जगदीश कवडीवाले, यशवंत सोनवणे, किरण अट्रावलकर, दिलीप नेवे, व्यवस्थापक चंद्रकांत वाणी यांचे सह सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत वाणी यांनी केले. यावेळी जागतिक महीला दिनानिमित्ताने श्री व्यास धनवर्षा बँकेच्या माध्यमातून महीलांचा सन्मान केल्याबद्दल शांता वाणी यांनी बँकेचे आभार मानले.


Protected Content

Play sound