कालानुरूप बदललेला महिला पत्रकारांचा धाडसीपणा कौतुकास्पद- महापौर (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामान्य जनतेसाठी लोकलढा महिला पत्रकारितेतून उभा राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.कालानुरुप बदललेली पत्रकारिता आणि या बदलत्या पत्रकारितेत महिला पत्रकारांचा धाडसीपणा कौतुकास्पद आहे. ही बाब अतिशय अभिमानाची असल्याचा गौरोवोद्गगार महापौर जयश्री महाजन यांनी काढला. दरम्यान, जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने माध्यम क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.

 

जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे माध्यम क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा मंगळवारी पत्रकार भवनात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला पत्रकार शांता वाणी, तर प्रमुख अतिथी म्हणून भावना शर्मा, लिना पाटील यांच्यासह विश्‍वस्थ अशोक भाटीया, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. गोपी सोरडे, सरचिटणीस पांडुरंग महाले उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन झाल्यानंतर माध्यम क्षेत्रातील महिलांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. शांता वाणी यांनी अध्यक्षीय समारोप केला. शुभदा नेवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.गोपी सोरडे यांनी केले. सुत्रसंचालन यामिनी कुळकर्णी यांनी तर आभार मनिष पात्रीकर यांनी मानले. कार्यक्रमाला चंदू नेवे, विश्वजीत चौधरी, जितेंद्र कोतवाल, किशोर पाटील, सचिन पाटील, भूषण हंसकर, गोकुळ सोनार, जुगल पाटील, शिवलाल बारी, अनिल केर्‍हाळे, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.

 

या माध्यमकर्मींचा सन्मान

शांताताई वाणी, भावना शर्मा, शुभदा नेवे, सरिता खाचणे, धनश्री बागुल, लीना पाटील, मुनिरा तरवारी, गौरी बारी, वैशाली पाटील, सोनम पाटील, गौरी जोशी, पुष्पा पाटील, सुवर्णा पाटील, सुनिता कोतवाल, प्रा. केतकी सोनार, जयश्री निकम, वर्षा लोहार, कविता ठाकरे, पल्लवी सोनवणे, विमल कोळी, शालिनी कोळी, जागृती भावसार, यामिनी कुलकर्णी, सविता कानडे यांच्यासह पत्रकार असलेल्या पतींचा जीव वाचावा म्हणून स्वतःचे यकृत दान करणारी आधुनिक सावित्री शारदा केर्हाळे, फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारप्राप्त प्रेमलता पाटील, कमी वयात पुस्तक लिहिणार्‍या सफिना सैफी यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Protected Content