गिरीश महाजन यांना ‘मोक्का’मध्ये अडकवण्याचा कट : फडणवीस यांनी उघड केले स्टींग

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी मोक्का मध्ये अडकवण्याचा कट असल्याचा आरोप करत याच्या स्टींगचे पुरावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिल्याने खळबळ उडाली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभत महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती आरोप केलेत. भाजप नेते गिरीश महाजन यांना मोक्काच्या केसमध्ये अडकवण्यासाठी कशा पद्धतीने षडयंत्र रचलं जात होतं. याचा पर्दाफाश त्यांनी विधानसभेत केला. सरकारी वकील, पोलीस, मंत्री आणि नेते कशा पद्धतीने या षडयंत्राचा भाग होते. महाजनांना ड्रग्जप्रकरणात अडकवण्याचं कसं षडयंत्रं होतं. गुन्हा कसा प्लांट केला जाणार होता, रेड कशी मारली जाणार होती, साक्षीदार कसे तयार केले जाणार होते आणि न्यायाधीशांना कसं मॅनेज केलं जाणार होतं? याचा पर्दाफाशच देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीस एवढंच करून थांबले नाहीत तर त्यांनी एक पेनड्राईव्हच विधानसभा अध्यक्षांना दिला. त्यात व्हिडीओच्या रुपात सर्व पुरावे असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणाची चौकशी पोलीस निष्पक्षपातीपणे करू शकत नाहीत. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याची मागणी त्यांनी केली. हे प्रकरण सीबीआयला दिलं नाही तर स्वत: कोर्टात जाऊन दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. फडणवीस यांच्या या आरोप आणि दाव्यांनी एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content