मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्याचे दिसून येत असले तरी चौथ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. या अनुषंगाने आयसीएमआरने आज चौथ्या लाटेबाबतची माहिती दिली आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांची संख्या १० हजारांहून कमी झाली आहे. तरीही कोरोनामुळे दररोज १०० च्या पुढे मृत्यूची नोंद होत आहे. कोरोनाचा घसरता आलेख पाहता काही तज्ञ कोविडचा प्रादुर्भाव संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवत असताना काही शास्त्रज्ञ कोरोनाची चौथी लाट पुन्हा येण्याबाबत बोलत आहेत. काही लोक म्हणतात की कोरोनाच्या चौथ्या आणि पाचव्या लाटा परदेशात आल्या आहेत, त्यामुळे इथेही कोरोनाच्या पुढच्या लाटा थोड्या विलंबाने येतील पण येणार हे नक्की.
दरम्यान, आयसीएमआर म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इम्प्लीमेंटेशन रिसर्च ऑन नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचे संचालक आणि कम्युनिटी मेडिसिन तज्ज्ञ डॉ. अरुण शर्मा म्हणतात की भारतात कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. त्याच वेळी, लोकांना कोरोनाच्या पुढील लाटेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या रूपात दिसलेले बदल आणि ज्याप्रकारे नवे रूप आले आहे, त्यानुसार कोरोनाबाबत कोणताही अचूक अंदाज बांधणे कठीण आहे.
डॉ.अरुण पुढे म्हणाले की, की सध्या कोरोनाचे कोणतेही नवीन म्यूटेशन आलेले नाही. ओमिक्रॉन नंतर, अद्याप एकही नवीन प्रकार आलेला नाही. याशिवाय, भारतातील सुमारे ८० टक्के लोकांना कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्तीसाठी पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत कोविडचे नवे रूप येत नाही, तोपर्यंत कोणतीही मोठी लाट येण्याची शक्यता नाही.
परदेशात आलेल्या शेवटच्या लाटेचे कारण ओमिक्रॉन प्रकार होता, तर भारतातही तिसर्या लाटेला हाच प्रकार प्रभावी ठरला आहे. यामुळे भारतातील कोरोना रुग्णांची संख्या लाखांवर पोहोचली आहे. परंतु, यानंतर दुसरा प्रकार नसल्याने पुढील लाट येण्याची शक्यता नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. कोरोना ही एक अशी महामारी आहे जी नियमितपणे त्याचे स्वरूप बदलत आहे, त्यामुळे कोरोना पुन्हा येणार नाही हे पूर्णपणे नाकारता येत नाही, पण आता लाट आली तर ती तितकीच धोकादायक ठरेल अशी अपेक्षा नाही. कोरोनाच्या तिसर्या लाटेत, हे देखील दिसून आले की ओमिक्रॉन प्रकाराने मोठ्या संख्येने लोकांना संक्रमित केले. मात्र, मृत्यू दरावर त्याचा विशेष परिणाम झाला नाही.