Home Cities यावल दहिगावात पार पडला दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 

दहिगावात पार पडला दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 

0
56


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला आठवणींना उजाळा कायम राहवा म्हणून महापुरुष व सरस्वती मातेची प्रतिमा भेट दिली, या निरोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सुरेश देवराम पाटील हे होते. तर प्रमुख म्हणून संचालक राजाराम महाजन, मुख्याध्यापक एस. डी. चौधरी यावेळी विद्यार्थ्यांनी दहावीचा पेपर कसा सोडवावा अभ्यासक्रम कसा करावा आणि शैक्षणीक जिवनात आपल्या मुरूजनांशी कसे वागावे, याबाबत उपस्थितांनी मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक एस.डी.चौधरी यांनी परीक्षाच्या नियमावली व गुणपत्रिका बाबतची माहिती मार्गदर्शनातुन दिली तर इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक व्ही.बी. पाटील, पी. बी.पाटील आणि बी. आर. महाजन यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन दिले.

प्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती माता व महर्षी वाल्मिक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमा शाळेला भेट म्हणून दिल्या व सर्व शिक्षक वृंददांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी रिजवाना तडवी, गायत्री साळवे, दुर्गेश पाटील आधी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले प्रस्तावना बी बी पाटील सूत्रसंचालन अजय पाटील व उपस्थितांचे आभार हे के अहिरे यांनी मानले .

 

 

 


Protected Content

Play sound