Home Cities जळगाव डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन

0
39


जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील सरदार वल्लभाई पटेल सभागृहात डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

शहरातील सरदार वल्लभाई पटेल लेवा भवन येथे डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने डॉ. श्री.. आप्पासाहेब धर्माधिकारी व श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिरास आज सकाळी प्रारंभ करण्यात आला. या शिबिरात दुपारी १२.३० वाजेपर्यंत जवळपास १५० श्री सदस्यांनी रक्तदान केले. तसेच आ. राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, शिवसेन जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आदी मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन प्रतिष्ठानाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सर्व श्री सदस्य उपस्थित होते. श्री सदस्यांनी हा रक्तदानाचा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा मानस व्यक्त केला.

भाग १

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/707310863768453

भाग २

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/655449039112816

 


Protected Content

Play sound