जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह विद्यापीठातील विविध शाखांचे प्रमुख, सिनेट सदस्य उपस्थित होते.