युपीएससी २०२३ परीक्षाचा निकाल जाहीर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर हा निकाल पाहता येईल परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव हा प्रथम आला आहे.

२०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेमध्ये अनिमेष प्रधान दुसरा, दोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या, पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या आणि रुहानी पाचव्या क्रमांकावर आहे. ११४३ जागांसाठी ही परीक्षा झाली होती. यातील १०१६ स्पर्धकांची शिफारस करण्यात आली होती. यात ३४७ जनरल कॅटेगरी, ११५ ईबीएस, ३०३ ओबीसी, १६४ एससी, ८६ एसटी प्रवर्गाचे स्पर्धक आहेत. ३५५ जणांना प्रोविजनल लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे.

परीक्षार्थींचे मार्क्स निकालाच्या घोषणेच्या १५ दिवसानंतर करण्यात येणार आहे. ९ एप्रिल २०२४ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेची मुलाखत झाली होती. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २८४६ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. यामध्ये १८० आयएएस, २०० आयपीएस आणि ३७ आयएफएस पदे होती.

Protected Content