नांद्रा माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

पाचोरा – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील अप्पासाहेब पी. एस .पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप संपन्न झाला.

दि. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को – ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णीद्धारा संचलीत नांद्रा ता. पाचोरा येथील अप्पासाहेब पी. एस .पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ माजी मुख्याध्यापक डब्लु. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ते म्हणाले, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थी हे सर्वगुण संपन्न असतात. मी ही तुमच्यासारख्या ग्रामीण भागातील शाळेत घडलो आहे. त्या गावची शाळा चांगली त्या गावचे ‌कर्तृत्व चांगले असते. याचे प्रतिबिंब समजात दिसून येते. भविष्यात आपल्या कर्तृत्वातून उज्ज्वल भारताचे प्रतिनिधित्व करा” असे आवाहन त्यानी केले.

प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा येथील गुरुकृपा होमिओपॅथी क्लिनिकचे संचालक डॉ.रुपेश पाटील, पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी, पाचोरा स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.वाय.जी.पाटील, उपाध्यक्ष विश्र्वनाथ पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष पाटील, त्र्यबंक तावडे, भारत पाटील, संजय तावडे, नंदकुमार बागुल, संजीव पाटील, मुरलीधर सुर्यवंशी, पत्रकार राजेंद्र पाटील, माजी मुख्याध्यापक एस. पी. तावडे, मुख्याध्यापक आर.एस.चौधरी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर.एस.चौधरी यांनी केले. कोविड -१९ कालावधीत वर्षभर राबविलेले उपक्रम आणि शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व इतर स्पधामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उत्तुंग भरारी याविषयी त्यानी माहिती देत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी कै. अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड स्मृतिदिन आयोजित शेंदुर्णी येथे कुस्ती स्पर्धेत यशस्वी खेळाडूस पदक देऊन सन्मानित केले.

एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती, राज्यस्तरीय निबंध स्पर्धा यात विजेत्यांना पुष्पगुच्छ व शालेय पॅड देऊन सन्मानित केले. विद्यार्थी मनोगतात जागृती कुंभार, दिपाली मिस्तरी, अश्र्विनी पाटील, अमरसिंग पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे डॉ. रूपेश पाटील ‘विद्यार्थ्यांना पुढील आव्हानास सामोरे कसे जायचे’ याविषयी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना ‘मोबाईल व वाहनं यांचा योग्य वापर करावा’ या बाबतीत मार्गदर्शन केले. शिक्षक मनोगतात सी. एस. पाटील, अविनाश निकम यांनी मनोगत व्यक्त केले. पी. ए. पाटील यांनी प्रमुख पाहुणे यांचा परीचय करुन दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डब्लु.एस.पाटील यांनी अभ्यासा बरोबर इतर सर्व क्षेत्रातही पुढे जाण्याचे आवाहन करत भूतकाळातील गोष्टीना उजाळा देत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जी.ए.ठाकूर आणि एस.बी.नाईक यांनी केले. आभार एल.एम.पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content