Home Cities जळगाव राज्यपाल दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

राज्यपाल दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

0
47


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत असून यात ते जैन हिल्स आणि विद्यापीठातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचे जळगाव एयरपोर्टवर आगमन होणार असून ते जैन हिल्स येथे मुक्कामाला राहणार आहेत. तर दुसर्‍या दिवशी ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

जिल्हा प्रशासनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हा दौरा प्राप्त झालेला आहे. यानुसार आता त्यांच्या दौर्‍यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.


Protected Content

Play sound