पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील पाचोरा नगरपरिषदर्फे शहरातील विविध भागात अनाधिकृत अतिक्रमण धारकांवर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची धडक कार्यवाही करुन अतिक्रमण काढण्यात आले
येथील पाचोरा नगरपरिषदर्फे शहरातील स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, बस स्टॅड रोड, रेल्वे भुयारी मार्ग परिसर, नगरपालिका जिन, आठवडे बाजार, मच्छी बाजार या भागात सार्वजनीक रस्त्यावर अनाधिकृत अतिक्रमण केलेल्या हातगाडी / फेरिवाले, रस्त्यावर बसून विक्री करणारे / टपरी धारक यांच्यामुळे खरेदीसाठी येणारे नागरीक, व्यापारी यांची वाहने मुख्य सार्वजनीक रस्त्यातच लावण्यात येत होत्या.
यामुळे शहरातील सार्वजनीक रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन, मोठी वाहने, ॲम्बुलन्स, विविध शासकिय विभागांची वाहने यांना अडचण निर्माण होऊन वाहनांचा धक्का लागून किरकोळ वाद निर्माण होणे, सोबतच नगरपालिका तर्फे विविध भागांमध्ये रस्ते मोठे करण्याचे काम देखील चालू आहे.
दि. १४ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी आपल्या अधिकारी / कर्मचारी यांना सोबत घेत धडक कारवाई करत शहरातील मुख्य सार्वजनीक रहदारीचा भाग स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, बस स्टॅड रोड, रेल्वे भुयारी मार्ग परिसर, नगरपालिका जिन, आठवडे बाजार, मच्छी बाजार, या भागात अनाधिकृत अतिक्रमण केलेल्या हातगाडी / फेरिवाले यांचे अतिक्रमण काढण्यात आले यांत हातगाडया जप्त करण्यात आल्यात काही नागरीकांनी स्वत:हुन त्यांचे नुकसान होऊन नये म्हणून आपले अतिक्रमण काढून घेतले.
शहरात सोमवारी झालेल्या या कार्यवाहीचे शहरातून सर्वत्र कौतूक होत असून यापुढे देखील अशा प्रकारची धडक कार्यवाही अशीच सुरु राहणार असून कुणीही सार्वजनीक रहीदारीस अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमण करु नये असे केल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगीतले.
सदर अतिक्रमणावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, प्रकाश दत्तात्रय भोसले, प्र.अ.,दगडु शिवाजी मराठे, कर निरीक्षक, दत्तात्रय जाधव, लेखापाल, मधुकर सुर्यवंशी, अभियंता (स्थापत्य), हेमंत क्षिरसागर, सहाय्यक नगर रचनाकार साईदास जाधव, कर निर्धारण अधिकारी, स. पो. नी. राहुल मोरे, प्रकाश पाटील, जगताप, बापु महाजन, सुनील पाटील व ट्रॅफीक विभागाचे पोलिस कर्मचारी हिमांश जैस्वाल, उपअभियंता स्थापत्य, प्रकाश शंकर पवार, लिपीक शाम ढवळे, लिपीक शामकांत पांडुरंग अहिरे, लिपीक शरद दामू घोडके, लिपीक,चंद्रकांत भगवान चौधरी, लिपीक, विजय बाविस्कर, लिपीक, अनिल पाटील, कों.लिपीक, विलास प्रभाकर देवकर, लिपीक पांडुरंग एकनाथ धनगर, लिपीक, भागवत पाटील, फायरमन, विशाल मराठे, लिपीक, महेंद्र गायकवाड, किशोर मराठे, दिलीप धर्मराज गायकवाड, सुभाष बागुल, शरद मधुकर नागणे, युवराज जगताप, नरेश आदीवाल, संदिप जगताप, सुकदेव ठाकुर, भिकन गायकवाड, सचिन जगताप, युसुफ कालु बेग, अर्जुन सुर्यवंशी, संदिप खैरनार, सुशिल पवार, वाल्मिक नामदेव गायकवाड,मुकादम,निळकंठ ब्राम्हणे, मुकादम युसुफअजीज पठाण आदी अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.