फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन यांच्याहस्ते करण्यात आला. यासह अनेक विद्यार्थी हे नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीला लागलेले आहेत त्यांचाही मान्यवरांच्याहस्ते सत्कार केला.
फैजपूर शहरातील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात १९८४ पासून सातत्याने दर्जेदार अभियंते घडवत आहेत. सोबतच विद्यापीठामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करीत आहेत. यावर्षी सुद्धा जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या दुर्गेश शशिकांत ठोंबरे व जयेश सुधाकर सरोदे या दोन विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. सोबत अनेक विद्यार्थी हे नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीला लागलेले आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला. यात लीना इंगळे : डाटामेटिका; देवयानी चौधरी : कॉग्नीझंट; श्रध्दा चौधरी : माईंड ट्री; कोमल पाटील : कॉग्नीझंट; कल्याणी महेश्री : असेंक्चर; नूतन वायकोळे : कॉग्नीझंट; उर्मीला झोपे: इन्फोसीस;योगीता पाटील:एचसीएल; भाग्येश कासार:कॅपजेमिनी; सूरज कोल्हे:टिसीएस; ममता चौधरी:टीसीएस;चेतन पाटील:टिसीएस;भाग्यश्री राणे:कॅपजेमीनी या विद्यार्थ्यांची प्लेसमेंटमध्ये निवड करण्यात आली.
संस्थाचालकांनी व्यक्त केले मनोगत
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्वप्रथम प्रा.डॉ.के. जी. पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन म्हणाले की, संस्थापक अध्यक्ष दादासाहेब जे.टी. महाजन यांनी ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे तांत्रिक शिक्षण आपल्या भागातच मिळावे या उदात्त हेतूने या संस्थेची निर्मिती केली. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरवातीच्या काळात पुणे विद्यापीठ, नंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यात सुद्धा सुवर्णपदकांची यशस्वी परंपरा कायम ठेवल्याने विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले व महाविद्यालयाचे ही यशोगाथा भविष्यात सुद्धा चालू राहील, ही अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. जी. ई. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी आपले १०० टक्के समर्पण देऊन महाविद्यालयाचे नाव उंच शिखरावर पोहोचवा असे आवाहन केले. तसेच तुम्ही आज काम करीत असलेले तंत्रज्ञान कदाचीत पुढच्या पाच-दहा वर्षात कालबाह्य होईल म्हणून त्यावरच अवलंबून न राहता, दररोज नवीन नवीन येणारे तंत्रज्ञान आत्मसात करून आयुष्यभर विद्यार्थी बनून रहा, असा मोलाचा सल्ला दिला. सोबतच सर्वांनी वेगवेगळे स्किल्स आत्मसात करावे असे सांगितले.
सत्कारप्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थिनी मोक्षदा फालक हिने सांगितले की, आपल्या महाविद्यालयातील पायाभूत सुविधा व नयनरम्य परिसर हा उत्तम दर्जाचा असून पुणे, मुंबई व इतर शहरी भागातील महागड्या शिक्षणापेक्षा आपल्या ग्रामीण भागातील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेज उत्तम पर्याय आहे व मी या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार
याप्रसंगी विविध नामांकित कंपन्यांमध्ये रुजू झालेल्या आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात टीसीएस कंपनीमध्ये लीना महाजन, मोहसिन पटेल, राजेश सपकाळ, गायत्री धांडे, चेतन पाटील, ममता चौधरी, हर्षल चव्हाण, नयना पाटील, नेहा जावळे, इन्फोसिस कंपनीमध्ये देवेंद्र भंगाळे, वृषाली पाटील, उर्मिला झोपे, दिक्षा चौधरी, कॅपजेमिनी कंपनीमध्ये राधिका भंगाळे, भाग्यश्री राणे, अमिषा पाटील, पुनम नेमाडे, पूजा पाटील, दुर्वेश बढे, कॉग्निझेंट कंपनीमध्ये चेतन चोपडे, पुष्पक खाचणे, राजेश सपकाळ, कोमल पाटील, आयबीएम मध्ये मोक्षदा फालक, रुपल खर्चे, बिरलासोफ्ट मध्ये आकाश बोरसे, विप्रो मध्ये योगेश पाटील, धनश्री बोरोले, झेंसार टेक्नॉलॉजीमध्ये हेमंत पाटील, झेड.एस. असोसिएट्स मध्ये केतन चौधरी हे विद्यार्थी हजर होते. तसेच याव्यतिरिक्त अनेक विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. त्यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्थाध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सचिव विजय झोपे, रामा पाचपांडे, प्रभाकर सरोदे, सुभाष भंगाळे, शशिकांत चौधरी, प्राचार्य डॉ. आर.डी.पाटील, उपप्राचार्य डॉ.एन. डी.नारखेडे, अकॅडमिक डीन डॉ.पी.एम. महाजन, टी.पी.ओ. डॉ.जी.ई.चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.एम.जी. भंडारी, प्रा.टी.डी. गारसे, प्रा.जी.डी. बोंडे, प्रा.ए.बी. नेहेते, प्रा. विकास महाजन, प्रा. ओ. के. फिरके, प्रा. एम. एम. बोरोले, प्रा. कीर्ती पाटील यांनी परिश्रम घेतले.