चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांची नुकतीच राज्याच्या ग्रामीण विकास नियोजन समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
चाळीसगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष अधिकारी तथा गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांची राज्य ग्रामीण विकास नियोजन समितीच्या सदस्य पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विकास करताना नियोजन करण्याकामी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने त्यांच्या ग्रामीण भागातील नागरिकांसोबत असलेली नाळ ओळखून व कार्याची दखल निवड करण्यात आली असल्याची चर्चा समाज माध्यमात सुरू आहे.