भुसावळ , प्रतिनिधी | येथील पु. ओं. नाहाटा महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांनी सावित्रीबाईंना अंतकरणात जपून ठेवायला हवे असे आवाहन उपप्राचार्य उत्तम सुरवाडे यांनी केले आहे.
भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात स्टाफ ॲकॅडमी आणि एन.एस.एस यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्टाप अकॅडमीच्या चेअरमन प्रा एम आर गुजर, कला शाखेच्या समन्वयक , प्रा स्वाती पाटील, यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक शोभा तळेले, समन्वयक प्रा . एस सावंत, समन्वयक प्रा आर एम खेडकर, समन्वयक प्रा एन वाय पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्रा. महेश सरोदे, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान महिला म्हणजे सामर्थ्य, मांगल्य ,पावित्र्य, जिथे स्त्री शक्ती जागृत होते, कार्यप्रवण होते. तिचे कार्यसंस्कृती हमखास यशस्वी होते, म्हणून महिलांनी सावित्रीबाईंच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून त्यापासून प्रेरणा घ्यावी असे प्रा. उत्तम सुरवाडे यांनी आवाहन केले आहे. दरम्यान संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक , महाविद्यालय प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी अधिकारी डॉ.भाग्यश्री भंगाळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एम एच सरोदे, प्रा. एल पी टाक, प्रा जे.डी धांडे, प्रा आर पी मसाने, प्रा एस बी राजपूत, प्रा व्हि.डी सावकारे , शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.