चिंता वाढली : जिल्ह्यात आज नवे १६ कोरोना रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ बाधित रूग्ण बरे होवून घरी पतरले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात १६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव-५, भुसावळ तालुक्यात-६, चोपडा तालुक्यात-१, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर-२ असे एकुण १६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८५४ हजार बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३६ बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत २ हजार ५७९ रूग्णंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Protected Content