जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलीस दल, युवाशक्ती फाउंडेशन व भंवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्त मंगळवार दि. ४ जानेवारी रोजी पोलीस वापरात असलेल्या यंत्रणेचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे.
नागरिक व पोलीस विभागामधील संवाद वाढावा हा या प्रदर्शनाच्या मागचा मुख्य उद्देश आहे. काव्यरत्नावली चौक येथे आयोजित प्रदर्शनात पोलीस वापरात असलेल्या शस्त्र, बिनतारी संदेश यंत्रणा, श्वान पथक, बंद पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक आदींची माहिती देण्यात येणार आहे. प्रदर्शनचे उद्घाटन मंगळवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पोलीस दलातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत व यासह विविध शाळेतील विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देतील. या विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीती जास्त कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दल, युवाशक्ती फाउंडेशन व भंवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या तर्फे करण्यात आले आहे.