एरंडोल भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार भगवान भरोसे – नागरिकांमध्ये रोष

एरंडोल, प्रतिनिधी | येथिल भूमिअभिलेख कार्यालयाच्या कारभराने तालुकावाशी त्रस्त झाले असून कार्यालयाला सकाळी साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयाला कुलूप असते. यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे.

 

शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला आहे. त्यातच भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याच प्रकारची शिस्त नसल्याचे दिसून येते. सकाळाचेच नाही तर सायंकाळी देखील साडेचार वाजेनंतर कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी हजर नसतात म्हणून कार्यालय भगवान भरोसे चालू आहे की काय अशी चर्चा त्रस्त नागरिकांमध्ये आहे. कार्यलयातील कर्मचारी व अधिकारी त्यांना वेळ मिळेल तेव्हा कामावर येतात की काय असे ग्रामीण भागातून येणाऱ्यांना वाटू लागले आहे. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून वेळेवर न येणाऱ्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी व कार्यालयात बायोमेट्रिक अटेंडन्स मशीन लावावे. बाहेर साईडवर जाणाऱ्या कर्मचार्यांविषयी सूचना लावावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Protected Content