मुक्ताईनगरात चार ठिकाणी छापे ; ४५ हजारांचे कच्चे रसायन नष्ट

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे अंतुर्ली, कुऱ्हा, उचंदा व घोडसगाव हद्दीत पथके तयार करून प्रॉव्हिशन गुन्ह्यांतर्गत चार ठिकाणी छापे टाकून ४५ हजारांचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पोळा सण शांततेत पार पडावा, याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे अंतुर्ली, कुऱ्हा,

उचंदा, व घोडसगाव हद्दीत पथक तयार करून  प्रॉव्हिशन गुन्ह्या खाली 04 ठिकाणी छापे टाकून केसेस  करून एकूण 45,000 रु किमतीची सुमारे 675 लिटर कच्चे पक्के रसायन, 70 लिटर गूळ, मोह नवसागर मिश्रित रसायन व 25 लिटर गहाभची तयार दारू असा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. सदर रेडकामी पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोउपनिरी परवीन तडवी, पोउपनिरी.प्रदीप शेवाळे, पोहेका संतोष चौधरी, पोहेकॉ गणेश मनुरे, पोहेकॉ संजय पाटील, अशोक जाधव, पो ना. संतोष नागरे, गजमल पाटील, अविनाश पाटील, मोतीलाल बोरसे, पोकॉ रवींद्र मेढे, हेमंत महाजन, संजय लाटे, राहुल नावकर, सागर सावे, राहुल बेहेनवाल ,अभिमान पाटील, राहुल महाजन, रवी चौधरी, माधव गोरेवार, मंगल साळूके असे हजर होते. तसेच मुक्ताईनगर शहरात पोहेकॉ श्रावण जवरे, पोकॉ.गोपीचंद सोनवणे, सचिन जाधव यांनी पत्ता जुगारावर रेड केली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!