चोरीच्या दोन कारसह दोन संशयित एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील जामनेर व पहूर येथून चारचाकी वाहने चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून यात दोन संशयितांना अटक केली आहे. 

शेख झिशान शेख दाऊद वय २७ रा. धाड, करडी ता. जि.बुलढाणा व शेख सद्दाम शेख कदीर वय २५ रा. घाट नांद्रा ता.जि. बुलढाणा या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ कार जप्त करण्यात आल्या आहेत.  सविस्तर माहिती अशी की, जामनेर पोलीस ठाण्यात तसेच जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्यात कार चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील संशयितांच्या शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना व मार्गदर्शन केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात विविध ठिकाणी बुलढाणा येथील दाऊद गँगबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने औरंगाबाद येथे जावून स्थानिक पोलिसांच्या मदतीने शेख झिशान व शेख सद्दाम या दोघांना अटक केली. जामनेर तसेच पहूर येथून कार चोरल्याची कबूली दिल्याने त्यांच्याकडून ६ लाख ४५ हजार रुपये किंमतीच्या दोनही कार जप्त करण्यात आल्या आहेत.

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन,शरीफोद्दीन काझी, वसंत लिंगायत, युनूस शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख. विनोद पाटील, उमेश गोसावी, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांचे पथक रवाना केले होते.

 

Protected Content