कासोदा येथे एकाच दिवशी तीन शिक्षक व एक शिपाई सेवानिवृत्त

4acb31cc 4aca 44f3 bafb 1ed778aaaa1b

कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील जळगांव. जिल्हा विद्या प्रसारक मंडळातर्फे संचलित साधना माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक ए.पी. पाटील, श्रीमती सी.पी. पवार, एन.ए. पाटील व प्रयोग शाळा सहाय्यक अमृत एस पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ एकाच दिवशी झाल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

 

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक एम.ए. पाटील व सर्व शाळा कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस.एम. पाटील, सी.जी. पाटील, आर.एम.आबा, बी.वाय. पाटील, एन.एन. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content