शिवाजीनगर उड्डाणपूलवर गर्डर टाकण्यास प्रारंभ

जळगाव, प्रतिनिधी | शहर तसेच शिवाजीनगरवासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याच्या कामास आज प्रारंभ करण्यात आला.

 

शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर आहे. आज शनिवार दि. १८ डिसेंबररोजी पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामास शिवाजीनगर भागाकडून सुरुवात करण्यात आली. गर्डर टाकणे व इतर काम जवळपास दोन ते अडीच महिने चालणार असून फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हे काम केले जात आहे. आज दोन महाकाय प्रत्येकी ५०टन क्षमतेच्या टेलिस्कोप क्रेन व इतर क्रेनच्या सहाय्याने गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे गर्डर वेगवेगळ्या वजनाचे आहेत. यात एक गर्डर २७ तर दुसरा ४७ टन वजनाचा आहे. गर्डर टाकण्याच्या काम पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. सायंकाळपर्यंत चार गर्डर टाकण्यात आले आहेत.

 

Protected Content