दहशतवादी हल्ल्यात चार जवानांसह एक अधिकारी शहीद

श्रीनगर वृत्तसंस्था |  जम्मू -काश्मीरच्या पीर पंजाब रेंजमधील राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईदरम्यान लष्कराचे ज्युनिअर कमिशन ऑफिसर यांच्यासह चार जवान शहीद झाले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना पुंछ सेक्टरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कराचे जवान तेथे पोहोचले आणि शोधमोहीम सुरु केली. या दरम्यान दहशतवाद्यांकडून लष्करावर गोळीबार सुरू करण्यात आला. या दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान, एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी आणि लष्कराचे ४ जवान चकमकीत शहीद झाले.

याशिवाय जम्मू -काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यात लष्कराने एक दहशतवादी ठार केला.  दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याने ऑपरेशन चकमकीत बदलले. गोळीबारालाही जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर एक पोलीस जखमी झाला, असे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले.

 

 

Protected Content