जनतेशी नाळ जुडलेले व प्रशासनावर घट्ट पकड असलेले पालकमंत्री म्हणजे गुलाबभाऊ ! : आ. चिमणराव पाटील

एरंडोल प्रतिनिधी ।  पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे खर्‍या अर्थाने जनतेशी नाळ जुडलेले आणि प्रशासनावर घट्ट पकड असलेले पालकमंत्री आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचा विकासाला गती मिळालेली आहे असे नमूद करत आमदार चिमणराव पाटील यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याची स्तुती केली. एरंडोल तालुक्यातील टोळी येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले.

तालुक्यातील टोळी येथील विविध विकासकामांच्या भूमिपुजनाच्या प्रसंगी त्यांनी पालकमंत्र्यांच्या कार्याची वाखाणणी करून शिवसेनेतील सर्व नेते एकत्र असल्याचा संदेश स्पष्टपणे दिला. तर याच कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी १५ दिवसांच्या आत टोळी येथे अंजनी नदीवरून पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केली.

या कार्यक्रमाला आमदार चिमणराव पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि प सदस्य नानाभमाऊ महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश  महाजन, जि. प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, उपसभापती अनिल महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा मनोज पाटील, बाजार समितीचे शालिकग्राम गायकवाड, संभाजी चव्हाण, उपतालुका प्रमुक रवींद्र चौधरी, धरणगावचे उपसभापती प्रेमराज पाटील, बोरगाव सरपंच नितीन पाटील,युवा सेनेचे तालुका अध्यक्ष बबलू पाटील,अतुल महाजन, उपनगराध्यक्ष व शहर प्रमुख कृनाल महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते गावातील विविध विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले. यात सिमेंट बंधारा, शाळा खोली, संरक्षण भिंत, बंदीस्त गटारी, हायमास्ट सोलर लँप, रस्ता कॉंक्रिटीकरण, जलशुध्दीकरण यंत्र आदी कामांचा समावेश होता.

याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्र्यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. शिवसेनेतील सर्व लोकप्रतिनिधी एकत्रच आहेत. आणि लोकप्रतिनिधी एकत्र असले की, गावाचा विकास कसा होतो ? हे टोळी गावाच्या विकास कामानी दाखवून दिले आहे. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघातून पक्षाचा खासदार निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून विजय संपादन करू असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, टोळी हे गाव अगदी पहिल्यापासून शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे. लोकप्रतिनिधींना विकासाचे व्हिजन हवे असते. हीच दृष्टी शिवसेनेच्या नेत्यांकडे आहे. यामुळे जिथेही शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहेत त्या गावांचा विकास झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कार्यकर्त्यांची मजबूत फळी असलेला नेता खरा श्रीमंत असतो. याचा विचार करता एरंडोल तालुक्यातील जनता आणि पदाधिकारी व कार्यर्त्यांनी आपल्याशी प्रदीर्घ काळापासून संबंध जोपासल्या बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होत असून यात शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तर जनता आणि कार्यकर्त्यांचे आशीर्वाद हीच लोकनेत्याची खरी एनर्जी असते. आपल्याला ही उर्जा विपुल प्रमाणात मिळाली असून याचमुळे काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले. दरम्यान, पालकमंत्र्यांचे भाषण सुरू असतांना टोळी येथील बाळासाहेब पाटील यांनी गावासाठी पाणी पुरवठा योजनेची मागणी केली. यावर ना. गुलाबराव पाटील यांनी येत्या १५ दिवसांमध्ये अंजनी धरणावरून गावासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा  केली.

टोळी येथील विशाल चव्हाण हा युवक हैदराबाद येथे आर्मीचे ट्रेंनिग पूर्ण करून आल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या जवानांच्या सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कृणाल महाजन यांनी केले.

 

Protected Content