शांततापूर्वक आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडणं हा पूर्वनियोजित कट – विशेष तपास पथकाचा खुलासा

मुंबई वृत्तसंस्था | शांततापूर्वक आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना लखीमपूर खेरीमध्ये गाडीखाली चिरडणं हा पूर्वीच नियोजित विचारपूर्वक केलेल्या कटाचा एक भाग होता, असा गंभीर खुलासा विशेष तपास पथकाने केला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर लखीमपूर येथे अहिंसकरित्या आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना महिंद्रा थार गाडीसह ताफ्यानं गाडीखाली चिरडल्याचा आरोप असून या घटनेत ४ शेतकरी आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संतापलेल्या उपस्थित शेतकऱ्यांनी गाड्यांनी आंदोलकांना चिरडलं त्या गाडीतील काही लोकांना बेदम मारहाण केली. यात मंत्री एक ड्रायवर आणि २ भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा मुख्‍य आरोपी आणि यांच्यासह इतर १४ सहकारी या विरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि काही गंभीर आरोपांचा समावेश करण्याची शिफारस या एसआयटीने केली आहे. त्यामुळे आता नवीन कलमानुसार गुन्हा दखल करण्यात येणार आहे.

Protected Content