मराठा आरक्षणासाठी खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार

नवी दिल्ली । मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागावा यासाठी राज्यातील खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचा निर्णय शरद पवार व अशोक चव्हाण यांच्यातील चर्चेत झाला आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबीत असून यातून मार्ग काढण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यातच येत्या २५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर आदी नेत्यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

यावेळी या शिष्टमंडळाने पवारांशी अर्धा तास चर्चा केली. या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान नेण्याबाबत चर्चाही केली. हे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्यास पवारांनी होकार दिल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. यामुळे आता मराठा आरक्षण प्रकरणी पंतप्रधानांनी लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content