पाचोरा येथे हभप रमेश वसेकर महाराजांचे भव्य स्वागत

पाचोरा, प्रतिनिधी । श्रीसंत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज ह.भ.प. रमेश वसेकर महाराज यांचे ११ रोजी पाचोरा नगरीत भव्य स्वागत करण्यात आले. रमेश वसेकर यांचे हस्ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाचोरा माळी समाजातर्फे रमेश वसेकर महाराजांचा सत्कार करण्यात आला. तसेच शहरातून जल्लोशात मिरवणूक काढण्यात आली.

श्रीसंत सावता महाराज यांची पवित्र जन्म भुमी, अरंणभेंडी ता. माढा. जिल्हा सोलापुर येथुन आलेले महाराजांचे १६ वे वंशज, ह.भ.प. रमेश वसेकर महाराज यांनी पाचोरा शहराला भेट देऊन भाविक भक्तांना आशिर्वाद दिला. यावेळी टाळ, मृदुंग, अभंग, भजन, गवळणी, पाडुरंग भजनी मंडळाने, मधुर वाणी गायनातुन मिरवणूकीला सुरवात केली. साऊंड सिस्टंम गाडी, गोरख महाराज ओझरकर हे होते. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुनते, जामनेर रोड मार्गे कृष्णापुरी भागातुन, नविन विठ्ठल मंदिर मार्गे तसेच माळी समाज कार्यालयात पांडुरंग विठ्ठल रूख्मीणी माता सावता महाराज मुर्तींची, पुजाआरती करून व महात्मा फुले सावित्रीमाई फुले पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून महाराजांनी मनोगतातुन आशिर्वाद देऊन माळी समाज कार्यालय कोंडवाडा गल्ली येथे मिरवणूकीची सांगता करण्यात आली. मिरवणूकीचे आयोजन, माळी समाज पाचोर्याचे कार्यकरते माऊली विठ्ठल एकनाथ महाजन, मधुकर रामदास महाजन, आर्जुन बारकु महाजन, शंकर भिला महाजन, गजानन महाजन, प्रमोद महाजन, अनिल महाजन, सुनिल उमाळे यांनी केले. यावेळी शिवाजी महाजन, वामन पाटील, आण्णा सोनार, नाना चौधरी, भागवत महाजन, वसंत महाजन, अतुल महाजन, एन. बी. महाजन, बापु महाजन, गोरख महाजन, राहुल महाजन, ज्ञानेश्वर महाजन, अनिल महाजन, प्रदिप महाजन, बबलु महाजन, रविंद्र महाजन सह भाविक भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली विठ्ठल एकनाथ महाजन यांनी तर आभार प्रमोद पोपट महाजन यांनी मानले.

Protected Content