जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बोदवड येथे आहे. या वसतिगृहात सन 2021- 22 या वर्षाच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे.
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आठवी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. परिपूर्ण भरलेला अर्ज घेऊन शालेय विभाग व कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय विभागासाठी 20 डिसेंबर 2021 पर्यंत तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पाहावयास मिळतील. विद्यार्थ्यांनी वरील पत्त्यावर संपर्क साधावा. वसतिगृह प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल. वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशिताना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साहित्यासाठी रुपये चार हजार, तसेच तसेच दरमहा निर्वाह भत्ता पाचशे रुपये व इतर अनुषंगिक सुविधा दिल्या जातात, असे गृहपालांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.