मनियार बिरादरीने क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील समाजसेवकांचा केला गौरव

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा मानियार बिरादरी ने पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त कांताई सभागृहात जळगाव जिल्ह्यातील उर्दू साहित्यिकांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. त्या समारंभात जिल्ह्यातील क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल गौरविण्यात आले.

क्रीडा क्षेत्र

शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान साजिद खान हिने कॅरम या खेळात अत्यंत उच्च पदी जाऊन जागतिक पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व केलं व भारताला सुवर्ण व कांस्य पदक मिळवून दिले तसेच आठ वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले व सुमारे ३२ वेळेला महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करून पदक मिळवले व आता नुकत्याच झालेल्या १  ते ५ डिसेंबर च्या राष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावून आपल्या जैन इरिगेशन संघाला सुद्धा सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल आयशा खान यांचा विशेष सत्कार महापौर जयश्री महाजन मुंबई उर्दू कारवा चे अध्यक्ष फरीद अहेमद, मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, एटीएम चे अध्यक्ष एजाज मलिक ,बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव रफिक काझी, पिंच बॉटलींग चे अध्यक्ष जफर शेख व थोर कादंबरीकार उस्मान जोहरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक क्षेत्र

राज्य नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत सूत्र संचलन करून मंत्र मुग्ध करणारे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे हेड ऑफ दि डिपार्टमेंट प्रो. डॉ. गयास उस्मानी यांना सुद्धा गौरविण्यात आले।

सामाजिक क्षेत्र

सामाजिक क्षेत्रातील  सामाजिक,कला, क्रीडा व वैद्यकिय क्षेत्रात कार्य करणारे व कोविड मध्ये वैद्यकीय शिबिरे घेणारे जळगाव शिकलगार बिरादरीचे कार्यकारी मंडळाचे सदस्य व अब्दुल ट्रान्सपोर्ट चे सहसंचालक अन्वर खान उस्मान खान व शिकलकर बिरादरीचे कासमवाडी येथील क्रियाशील संचालक जावेद खान जहांगीर खान हे समाजासाठी व खास करून गोरगरिबांसाठी करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांचासुद्धा गौरव करण्यात आला.

 

 

 

Protected Content