श्रीच्या १०९ व्या पुण्यतिथी उत्सवास आजपासून प्रारंभ

WhatsApp Image 2019 08 31 at 7.56.36 PM

शेगाव, प्रतिनिधी | येथील श्री संत गजानन महाराजांच्या १०९ व्या पुण्यतिथी उत्सवास आज ३१ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे यानिमित्ताने ३ सप्टेंबरपर्यंत श्रींच्या मंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या उत्सवादरम्यान मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन व काही अप्रिय घटना घडू नये याची दक्षता म्हणून वनवे एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात दर्शनवारी, पारायण, मंडप, श्रींची गादी व पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी उत्सवात सर्वतोपरी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content