Home Cities जळगाव भाजप महिला आघाडीतर्फे रामानंदनगर पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार

भाजप महिला आघाडीतर्फे रामानंदनगर पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार

0
35

जळगाव प्रतिनिधी | खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीवर अश्‍लिल भाषेत वक्तव्य केले. या वक्तव्याचा भाजपतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. गुरुवार, ९ डिसेंबर रोजी भाजप महिला आघाडीतर्फे रामानंदनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षकांना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, नगरसेविका गायत्री राणे, जिल्हा सरचिटणीस वंदना पाटील, ज्योती निंभोरे, महिला सोशल मिडीया प्रमुख स्नेहा निंभोरे, जिल्हा चिटणीस निला चौधरी, रेखा वर्मा, रेखा पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. अश्‍लिल वक्तव्य करणार्‍या खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाच्या वतीने करण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक विजय शिंदे यांना हे निवेदन देण्यात आले.


Protected Content

Play sound