जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची आज झालेली सिनेटची सभा विविध विषयांवरून गाजली. यातील परिक्षापत्रीकांच्या देयकातील घोळावरून शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले. अखेर या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा़ बी़ व्ही़ पवार आणि प्रभारी कुलसचिव आऱ एल़ शिंदे यांची उपस्थित होते. सुरुवातीस जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्या अधिका-यांना यासह बाबासाहेब पुरंदरे, साहित्त्यिक द.मा.मिरासदार, मृत विदयापीठ कर्मचारींना यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
या सभेत शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग, शिक्षक भरतीचा निर्णय, रोजंदारी कर्मचारींचा प्रश्न, आश्वासित प्रगती योजना, महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान आदी यासह इतर विषयांवर चर्चा होऊन काही ठराव करण्यात आले. ते ठराव शासनास मंजुरीसाठी पाठविण्यात यावे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
शासनाने २०२१ पर्यंतचा कार्यभार विचारात घेऊन महाविद्यालयीन रिक्त पदे भरती करण्यास परवानगी द्यावी यासह शासनाने बंद केलेले महाविद्यालयांना २० टक्के वेतनेतर अनुदान मंजूर करावे हा ठराव गौतम कुवर यांना मांडला़. विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचा-यांच्या १४ पदांना सातवा वेतन आयोग लागू असून ३५० पेक्षा अधिक कर्मचारी यापासून वंचित आहेत. त्यामुळे पहिल्या लाभाची आश्वासित योजनेचे लाभ देऊन पाठविलेले प्रस्ताव सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालय, जळगाव यांनी मंजूर करुन कर्मचाऱ्यांना लाभ विस्तारित करावे,
यासह विद्यापीठात कार्यरत रोजंदारी कर्मचारी यांना सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पुन्हा पाठवून विद्यापीठ पदभरतीचे नियम करतांना रोजंदारी कर्मचारी यांना प्राधान्य देण्याचे नियम शासनास पाठवावे हे ठराव प्रा. गौतम कुवर,नितीन ठाकूर यांनी मांडले त्यास इतर सदस्यांनी सर्वानूमते मंजूरी देऊन हे ठराव शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला़
कोरोना काळाच्या प्रभावानंतर महाविद्यालय सुरू झाली़ परंतू प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षा ऑनलाइन होणार असल्याबाबतचे परीपत्रक धडकताच विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येणे टाळत आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या अनुषंगाने सर्व परीक्षा ऑफलाईन घेन्युअत याव्यात अशी मागणी एकनाथ नेहते यांनी केली़ तर युवारंग, राष्ट्रीय सेवा योजना शिबीर, यासह इतर विद्यार्थी उपक्रम सुरु करावे याबाबत अमोल मराठे यांनी सूचना मांडल्या त्यास शासन निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल असे प्रभारी कुलगुरु यांनी सांगितले.
कोरोना काळात ऑनलाइन – ऑफलाइन परीक्षा घेण्यात येऊन कोट्यावधी रूपयांचे बिले सादर करुन ती मंजूरसुध्दा करण्यात आली़. यात सर्वच कामांचे दर अधिक लावण्यात आल्याचा आरोप अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे यांनी केला़. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाने खुलासा देऊन या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली़.
यावर ही बाब गोपनीय असल्याचे कुलगुरूंनी यांनी सांगितले तेव्हा जोपर्यंत विद्यापीठ खुलासा करित नाही तोपर्यंत आपण सभागृहात ठिय्या मांडू असा पवित्रा विष्णू भंगाळे यांनी घेऊन त्याठिकाणी सभागृहात ठिय्या मांडला़. अधिसभा सदस्य सतिष पाटील व अधिसभा सदस्य एकनाथ नेहते यांनी चौकशी समितीची करुन समितीत सेवानिवृत्त न्यायाधीशाचा समावेश असावा अशी मागणी केली़. त्यावर राज्यातील इतर ठिकाणी दरांची तपासणी करून चौकशी समिती नेमण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर भंगाळे यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले़
सभेतील चर्चेमध्ये व्य.प.सदस्य दिलीप पाटील, प्रा. विवेक लोहार, प्रा. मोहन पावरा, प्राचार्य एल.पी. देशमुख, प्रा. जे.बी. नाईक, दिपक पाटील यांच्यासह सिनेट सदस्य प्रा. के.जी. कोल्हे, प्रा. अनिल पाटील, प्रा. ई.जी. नेहते, प्रा. अजय पाटील, प्रा. पी.बी. अहिरराव , प्रा. सुनील गोसावी, प्राचार्य ए.टी. पाटील, दिनेश नाईक, अमोल सोनवणे, प्रा.मधुलिका सोनवणे, प्राचार्य अशोक खैरनार, अॅङ संदीप पाटील, डॉ. सतीश पाटील, प्राचार्य एस. आर. जाधव, जी.वाय. पाटील, गिरीश पाटील, प्रा. मनीष जोशी, मनीषा चौधरी, प्रा. प्रमोद. पवार आदी अधिसभा सदस्य सहभागी झाले. प्रभारी कुलसचिव प्रा. आर.एल. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.