Home Cities अमळनेर अमळनेरात दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा उपक्रम

अमळनेरात दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा उपक्रम

0
33

अमळनेर प्रतिनिधी | शहरातील साने गुरुजी विद्यालयात खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १२ डिसेंबर रोजी खासदार खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन शुक्रवार, दि.१० डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ४ दरम्यान साने गुरुजी विद्यालयातील एस.एम.गोरे सभागृहात करण्यात आले आहे.

या शिबिराचे उदघाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार असून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी रा.वि.काँग्रेस प्रदेश प्रभारी सनी मानकर यासह जि.प.सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, संदीप घोरपडे, रा.कॉ.तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, विनोद कदम, जिल्हा नियोजन समिती सदस्य भागवत पाटील, शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पाटील यांची उपस्थिती असणार आहे

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील तसेच शहराध्यक्ष सुनील शिंपी यांनी केले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका व शहर पदाधिकारी शिबीरासाठी मेहनत घेत आहेत.


Protected Content

Play sound