गिरणा नदी पात्रातील वाळू लिलाव थांबविण्याची निवेदनाद्वारे मागणी

भडगाव, प्रतिनीधी | शहरातील वडधे येथील गिरणा नदी पात्रातील वाळू लिलाव नुकतीच जाहीर करून टेंडर देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. यामुळे वाळू लिलाव रद्द करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तर्फे नायब तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केले आहेत.

तालुक्यातील वडधे हे गाव भडगाव नगरपालिका हद्दीत असून नगरपालिकेवर दोन वर्षांपासून प्रशासक नियुक्त आहे. असे असताना वाळू लिलावाला मंजुरी कशी मिळाली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी नागरिकांनी वाळू लिलावाला प्रचंड विरोध केला. तसेच यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. तरीही गिरणा नदी पात्रातील वाळू लिलाव नुकतीच जाहीर करून टेंडर देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे वाळू लिलाव रद्द व्हावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मनसे तर्फे नायब तहसिलदार भालेराव यांना देण्यात आले आहे.

निवेदनात काही दिवसापूर्वी भडगाव शहराला पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्या वेळी टँकर द्वारे शहरात पाणी पुरवठा करावा लागला. तसेच गिरणा नदी किनाऱ्यावर अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत. वाळू लिलाव झाल्यास त्या ठिकाणाहून वाळू उपसा प्रचंड प्रमाणात होईल व पाण्याची पातळी खालवेल या मुळे शहरातील नागरिकांना व शेतकरी वर्गाला पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे तालुक्यातील वाक ग्रामपंचायत व भडगाव नगरपरिषदेची पाणी पुरवठा करणारी विहीर काही अंतरावर आहे. वाळू लिलाव झाल्यास दोन्ही गावांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागेल. यामुळे सदरचा वाळू लिलाव हा लोक हिताचा नसून वाळू लिलाव हा अनेक समस्यांना निर्माण करणारा आहे. मनसे व शहरातील नागरिकांची होणाऱ्या वाळू लिलावास विरोध असून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा १७ डिसेंबर, शुक्रवार रोजी लिलाव रद्द होण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, आयुक्त सो. नासिक विभाग, उपविभागीय अधिकारी पाचोरा, पोलिस निरीक्षक भडगाव यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर मनसे जिल्हाअध्यक्ष अनिल वाघ, जहांगीर मालचे, हिरामण बाविस्कर, अमोल कांबळे आदींनी सह्या केल्या आहेत.

Protected Content