जनरल बिपीन रावत व सहकारी शहिदांना जळगावकरांनी वाहिली आदरांजली

जळगाव प्रतिनिधी । युवाशक्ती फाऊंडेशन व भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक येथे तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारतीय लष्कर व वायुसेनेचे निधन झालेल्या जनरल बिपीन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल.एस.लिद्दर, लेफटेनंट कर्नल हरजिंदर सिंग,नाईक गुरुसेवक सिंग, नाईक जितेंद्रकुमार, लान्स नाईक विवेककुमार, लान्स नाईक बी. साई तेजा, हवालदार सतपाल, विंग कमांडर, पृथ्वीसिंह चौहान (पायलट),स्कोवाड्रन लिडर के. सिंह (को पायलट), जुनिअर वॉरण्ट ऑफिसर दास, जुनिअर वॉरण्ट, ऑफिसर ए. प्रदीप वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली मेणबत्ती पेटवून तसेच पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या वेळी जनरल रावत यांच्या नेतृत्वात काम केलेले जळगावचे माजी सैनिक सुभेदार मेजर राजेंद्र चव्हाण, नाईक दिलीप बडगुजर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, विराज कावडीया, अमित जगताप, प्रकाश जैन, फारूक शेख, अर्जुन भारुडे, एम.पी.पाटील, मोहन गांधी, सागर बागुल, राजू पाटील, सौरभ कुलकर्णी, प्रीतम शिंदे, मयूर जाधव, भटू अग्रवाल, राम मोरे, आकाश येवले, अक्षय जैन, मनजीत जांगीड, संदीप सूर्यवंशी, प्रशांत वाणी, गिरीश कुलकर्णी, जड्डू पाटील, लक्ष्मण पाटील, भालोजीराव पाटील, प्रसाद जैन, अश्फाक शेख, भवानी अग्रवाल, नवल गोपाळ, भूषण सोनवणे, सयाजी जाधव, संदीप सूर्यवंशी, राखी वायकोळे, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे शिवाजी धुमाळ, हर्षल पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content