मनपात ‘ना हरकती’साठी आ.खडसेसह ६ जणांचे अर्ज

jalgaon 1

जळगाव, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना ते ज्या हद्दीत राहतात त्या हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थेची ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असत‌े. शहरातील इच्छुक उमेदवारांनी सध्या ‘ना हरकत’ घेण्यासाठी महापालिकेत अर्ज दाखल सुरुवात केली आहे. आ एकनाथराव खासेंसह ६ जणांनी ‘ना हरकती ‘साठी अर्ज दाखल केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना घरपट्टी विभाग, अग्निशमन विभाग, प्रभाग समितीचा दाखला, दुकाने, गाळे, मालमत्ता कर, खुला भूखंड कर विभाग या सर्व विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. उमेदवारीसाठी सध्या महापालिकेत माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, दुध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे,जिल्हा बॅकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, ललति शर्मा, सुनील खडके,चंदन महाजन यांनी महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दिले आहेत.

Protected Content