म्हसावद येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्सहात साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील म्हसावद येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन व  क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

आज मंगळवार दि. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास भारत माता  व काकाजी स्वातंत्र्यसैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे यांच्या फोटोला वंदन करून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते निलेश पवार  यांनी जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.  विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जी. डी. बच्छाव यांनी  संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे काकाजी यांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांसमोर मांडला.  तसेच देशभक्ती म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.  एस. एम. नेतकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात मेरे देश की धरती आणि भारत का रहने वाला हू भारत की बात सुनाता हु हे देशभक्तीपर गीते सादर केली.  एस. बी. सोनार  यांनी  क्रांती दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. सोनार, उपमुख्याध्यापक जी. डी. बच्छाव, ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख योगराज चिंचोरे, शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण, म्हसावदचे माजी उपसरपंच  विवेक किशोर चव्हाण,  प्रमुख वक्ते एस. एम. नेतकर,  निलेश पवार, ज्येष्ठ शिक्षक एस. एम. पिंगळे, एस. जे. पवार आणि सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. जे. पवार  आणि आभार एस. एम. पिंगळे यांनी मानले.  यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सहकार्य केले.

 

Protected Content