जळगावात आयशरने महिलेला चिरडले; एक गंभीर

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथून लग्नाहून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरच्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाले आहे. ही घटना आज सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास बॉम्बे बेकरी जवळ घडली. याप्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील प्रभात कॉलनी येथे राहणारे किशोर हिरामण तळेले आणि त्यांची पत्नी मिना किशोर तळेले (वय-५३) हे गावातील नातेवाईकांकडे लग्नासाठी दुचाकीने गेले होते. लग्न आटोपून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीसी ६०२५) ने अजिंठा चौफुलीवरून इच्छादेवी रोडवरून दोघेजण घरी जात असतांना राष्ट्रीय महामार्गावरील बॉम्बे बेकरीजवळी स्पीड ब्रेकरजवळ दुचाकीवरील तोल गेल्याने मिना तळेले ह्या रोडवर पडल्या. त्यातच मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने त्यांना चिरडले. तर पती किशोर तळेले हे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास घडली. मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पती किशोर तळेले, कुंदन आणि चंदन हे दोन मुले असा परिवार आहे.

घटना घडताच एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस कर्मचारी अल्ताफ पठाण, नितीन पाटील, इम्रान बेग, गणेश शिरसाठ, तुषार चौधरी आदीं रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती तर वाहतूकीचा खोळंबा झाला होता. यावेळी पोलीसांच्या मदत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content