शेंदुर्णीत पथनाट्याव्दारे स्वछ्तेबाबत जनजागृती

शेंदुर्णी प्रतिनिधी । नगरपंचायतीच्या वतीने सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनात आज (दि.२४ डिसेंबर) रोजी वाचनालय चौक, पारस चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व वाडी दरवाजा चौक येथे  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात ग्लोबल सोल्युशन नासिक यांचेमार्फत पथनाट्य सादर करण्यात आले. 

कलावंतांनी पथनाट्या व्दारे स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. त्यात प्रामुख्याने ओला, सुका व घरगुती घातक कचरा, यांचे वर्गीकरण समजावून सांगितले व वयक्तिक शौचालयाचा वापर करा, उघड्यावर शौचास जाऊ  नका, स्वच्छता अँप डाउनलोड करून आपल्या शहराबद्दल अभिप्राय नोंदवावा, झाडे लावा झाडे जगवा व माझी वसुंधरा अभियानात सहभागी व्हा, अश्या प्रकारची कलावंतांमार्फत विविध पथनाट्यातुन जनजागृती करण्यात  आली.

 

Protected Content