जळगाव प्रतिनिधी | महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाईन भरण्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून नोव्हेंबर महिन्यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सव्वातीन लाख ग्राहकांनी ६१ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा केला आहे.
महावितरणने www.mahadiscom.in या वेबसाईटवर ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेसह मोबाईल ऍप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्यासाठी व भरण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश काड्र्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल ऍपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे. कोरोनामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने पुढाकार घेत वीजबिले ऑनलाइन भरण्याचे आवाहन केले. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला असून, ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महत्त्व पटत असल्याचे दिसत आहे. आता इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालल्याने बिल भरणा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे. तसेच कोरोना काळात लोकांच्या संपर्कात येऊन संसर्गाचाही धोका टळत आहे. जळगाव जिल्ह्यात २ लाख ६ हजार ५६ ग्राहकांनी ३६ कोटी ६१ लाख, धुळे जिल्ह्यात ८६ हजार १५६ ग्राहकांनी १८ कोटी ७२ लाख तर नंदुरबार मंडलात ३४ हजार १६८ ग्राहकांनी ५ कोटी ८० लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे.
महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी मगो-ग्रीनफ संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा १० रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती ुुु.ारहरवळीलेा.ळप या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
बिलात ०.२५ टक्के सूट
ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट सुलभतेने करता यावे व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.
तात्काळ मिळते पोच
वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटवर मपेमेंट हिस्ट्रीफ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.